मामाच्या गावाला जाऊया

मामाच्या गावाला जाऊया

सर्वात आधी  सर्व वाचकांना माझा मनःपूर्वक नमस्‍कार. खूप दिवसांनी हा  ब्लॉग लिहिण्यास सूरूवात केली आहे. आशा करते तुम्‍हा सर्वांना  नक्‍की आवड़ेल.

खरं म्‍हणजे, हे शीर्षक वाचूनच मला अगदी मनापासून लिहायची इच्‍छा झाली.

लहानपणी मुलांना हौस असते, परीक्षा संपल्‍यावर आईच्‍या मागे  लागायची. आई चल ना गं कुठेतरी सुट्ट्यांमध्ये, कुठे नाही तर मामा कड़े तरी चल. आम्‍ही बहिणी सुद्धा  आईला म्‍हणायचो, आई चे दोघे मामा मुंबईलाच  राहायचे आणि  इतर नातेबाईक पण सगळे तेथेच रहात  असल्‍याने आमची मज्‍जाच मज्‍जा.

वाचकांनो  तुम्‍हाला ही गोष्‍ट माहिती झाल्‍यावर, अगदी नवल वाटेल की, माझी आई आणि मावशीला आपल्‍या जवळ ठेवून, त्‍यांचे शिक्षण पूर्ण करवून, त्‍यांचे लग्‍न सुद्धा लावून दिले हो, मामांनी! ते मुंबइला {डोंबिवलीतच}रहायचे  आणि इतर नातेबाईक सुद्धा तिथे राहात असत.

माझे बाबा शासकीय नोकरी  करत असल्‍याने, त्‍यांना सुट्टया मिळायला, खूपच ओढाताण  व्‍हायची हो, मग काय आमची उन्‍हाळ्यांची सुट्टी सुरू झाली की, बस बाबा आमचे रिझर्वेशन  करून आम्हा बहिणींना छुक-छुक गाड़ीत बसवून द्यायचे. मग काय हो, माझं गाणं सूरू अगदी नेहमी प्रमाणे, झुक-झुक, झुक-झुक अगिन गाड़ी, फुलांच्‍या रेषा हवेत काढी, पळती झाड़े पाहुया, मामाच्‍या गावाला जाऊया..जाऊया…जाऊया, गाण सुरू माझं.

माझा मामा मस्‍त आम्‍हाला घ्‍यायला यायचा. सर्वात मज्‍जा म्‍हणजे, एक महिना कुठे निघून जायचा काही माहीतच नाही पड़ायचे हो. सकाळी एका मावशी कड़े जेवायला जायचो, तर संध्‍याकाळी दुसऱ्या , काही कशाची काळजीच नसायची. त्‍याच बरोबर लहानपणी जी मज्‍जा असते, ती मोठे झाल्‍यावर हळूहळू कमी होत जाते. फक्‍त राहून जातात तर आठवणी. विशेष सांगायचे थोड़क्‍यात तर सर्व नातेबाईक, काही समारंभ असो या नसो, सगळे अगदी प्रेमाने भेटत होते, एका जागेवर एकत्र होत होते हो.

हल्‍ली च्‍या काळात सगळं तकनीकी ज्ञान आल्‍यामुळे आणि लहानपणा पासून पोरांना अगदी अभ्‍यासात गुंतल्यामुळे  मुळे हे मामाचे गाव कुठे तरी हरवले आहे. त्‍यांना .माहीतच नाही पड़त की आपलं  पण  मामाचे गाव आहे का कुठेतरी?

आजकल काय झाल आहे की आई-वड़ील जास्‍त करून नोकरीत आणि आपल्‍या स्वतःच्या  व्‍यवसायात गुंतलेले  असल्‍याने, त्‍याच बरोबर महत्‍वाची गोष्‍ट की त्‍यांना सुट्टया जास्‍त नसल्‍याने, मामा कड़े जायचे काय आणि कुठे ही फिरायला जायचे का , त्‍यांनाच वेळ देता नाही येत हो आपल्‍याच पोरांना. पालक आपल्‍यात आणि पोर आपल्‍या ह्या नवीनतम शैक्षणिक तकनीकी  अभ्यासात गुंतलेले  आहेत.

माझे सर्व वाचकांशी सादर निवेदन आहे कि जरी मामा चे गाव हरवले असले तरी आपल्‍या पाल्‍यासाठी वेळेचे महत्‍व वाचवून ठेवा हो, त्‍यांना भरपूर वेळ द्या. त्‍यांना कुठे बाहेर चांगल्‍या जागेवर फिरायला घेऊन जा आणि त्‍यांच्‍या मना प्रमाणे पण करा कधीतरी. आजकल आपण बघत आहोत की मुलं  आपल्‍या आईवडिलांपासून  कुठे तरी हरवून गेले आहेत, अशी वेळ येऊ नका देऊ हो. त्यांच्या  मनाला समजून घ्‍या आणि गोड़ी-गुलाबीनी जर समजवले न तर ते तुमचे सांगितलेले अगदी ऐकतील , अशी खातरी आहे मला हो.

माझा एकच चुलत भाऊ हो, तो पुण्‍यात असताना की नाही माझे दोघे पोर जायचे राह्यला, खरं सांगायचे तर त्‍यांना मामा-मामी चांगलेच भेटले हो. आपल्‍या पोरांना आपण किती तरी प्रेम देतो, पण मामाची गरज पोरांना कुठे तरी भासतेच हो. तुमचे काय मत आहे ? सांगाल मग आपल्‍या कमेट्स च्‍या माध्‍यामाने आणि त्‍याच बरोबर कसा वाटला माझा ब्‍लॉग?

Disclaimer: The views, opinions and positions (including content in any form) expressed within this post are those of the author alone. The accuracy, completeness and validity of any statements made within this article are not guaranteed. We accept no liability for any errors, omissions or representations. The responsibility for intellectual property rights of this content rests with the author and any liability with regards to infringement of intellectual property rights remains with him/her.

Previous article «
Next article »