जगण्याला मिळाली नवीन दिशा

जगण्याला मिळाली नवीन दिशा

खरंच आहे हो जीवनात जेव्हा परिस्थिती आपल्या हातात नसते, तेव्हा प्रत्येक माणूस गड़बडून जातो, असंच काहीसं घडलं क्षमा बरोबर. पण ती सर्वात मोठी बहीण  होती चार भावंडांची.

गव्हर्नमेंट प्रेस मध्ये होते तिचे वडील आणि एका एकीच त्यांची तब्येत बिघडली आणि ऑफिसच्या लोकांनी त्यांना घरी सोडले, पाणी मागितले, घाम सुटला आणि त्यांना देवाज्ञा झाली. क्षमा वर सर्व जबाबदारी आली, आता आईसह भावंडांना पण सांभाळायचे गरजेचे होते.

ती खंबीरपणे परिस्थितीला सामोरी गेली. कुटुंबाला आर्थिक मदत केली. नगर निगम मध्ये सर्विस करत होती आणि तेथे वातावरण पण तेव्हां चांगले नसायचे, तरी घराचे संगोपन करण्यासाठी प्रयत्नशील राहून सर्व काम मुलगी असून पण मुला सारखेच संपवत असे.

आता आईला काळजी वाटायची, हिचे लग्न कसे व्हायचे म्हणून पण ती मात्र खंबीरपणे कुणाचा विचार न करता भावंडाना चांगले शिक्षण मिळावे ह्यासाठी प्रयत्न करत होती आणि त्यात यश मिळवत होती.

कधी-कधी जीवनात आपल्याला असेच काही निर्णय आपल्या माणसांसाठी घेणं गरजेचं असतं कारण की आपण त्यांच्यासाठी जगात आलेलो असतो.

प्रत्येकाने आपल्यातला मी काढून टाकला न तर सर्व उत्तरे आपल्याला सापडतील. मग पुढे तिने फक्त आपल्या हातात जे होते ते केले. भावंडांचे भविष्य चांगले व्हावे यासाठी ती सतत प्रयत्नशील होती.

त्याचबरोबर  तिने एम.ए. हिंदीच्या परीक्षा सतत अभ्यास करून चांगल्या मार्काने पास केली, त्याचा फायदा तिला लवकरच मिळाला आणि तिला सेक्शन हेड़ म्हणून प्रमोट केले.

आर्थिक बाजू बळकट झाल्यामुळे पैसा अड़का काहीच त्रास झाला नाही  आणि भावांचे शिक्षण सुद्धा निश्चिन्तपणे  पूर्ण झाले. आईला मात्र काळजी वाटायची की दिवसेंदिवस वय होतं चालले होते क्षमाचे, पण परिस्थितीला तोंड देण्यासाठी साठी तिने आपल्या लग्नाचा विचार न करता आपल्या भावंडांची लग्न लाऊन दिली आणि त्यांच्या संसारात रमून गेली.

तिला फक्त वाटायचं की मी सर्वांची मदत करीन. नंतर भावांना पोर-बाळांच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाणे भाग होते मग ते सुद्धा त्यांच्या संसारात रमून गेले.

क्षमा मात्र आपल्या आईबरोबरच राहिली. तिची पूर्ण सेवा करत होती. असेच काही दिवस सुरू होते, पण आपण म्हणतो न की कधी-कधी परिस्थिती आपल्या हातात नसते. एकेदिवशी आईलेकी मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलेल्या, बघतात तर काय मंदिराच्या पायरीवर लहानशी छकुली दिसली, ती पायरीवरून पडणार तेवढ्यात क्षमाने कडेवर उचलून घेतले आणि गुरूजींना विचारले की कोणाची आहे हो. गुरूजी म्हणाले हे तर मला माहित नाही पण तुम्ही मात्र देवाने दिलेली लक्ष्मीला त्याचे प्रसादाचा रूपात स्वीकारा.

मग आई म्हणाली अग क्षमा गुरूजी बरोबरच तर म्हणतात आहे, देवाने दिलेली लक्ष्मीला स्वीकार कर. देवाने, हाच आशीर्वाद दिला असे समजून तिच्या जगण्याला एक नवीन दिशा दे म्हणजे तुझे हे जीवन सार्थक होईल.

Disclaimer: The views, opinions and positions (including content in any form) expressed within this post are those of the author alone. The accuracy, completeness and validity of any statements made within this article are not guaranteed. We accept no liability for any errors, omissions or representations. The responsibility for intellectual property rights of this content rests with the author and any liability with regards to infringement of intellectual property rights remains with him/her.