जीवनाच्या प्रत्येक क्षणात अनुभवलेल्या विविध रंगी कथा आणि कविता

जीवनाच्या प्रत्येक क्षणात अनुभवलेल्या विविध रंगी कथा आणि कविता

१. मातृभाषा दिवसानिमित्त

आज मराठी भाषेचा वर्तमान अतिशय सुंदर असल्याचेच दिसते आणि यावरूनच तसेच वर्तमान पिढीचे कार्य, विचारसरणी बघता मराठी भाषेचे भविष्य यापेक्षाही उत्कृष्ट दर्जाचे नक्कीच होणार.

तेव्हा मित्रांनो, या भाषेचा उद्धार करण्याचे काम आपल्या सर्वांनाच एकत्र येउन करावे लागणार आहे, ते करताना या भाषेचा उपयोग जास्तीत जास्त करणे आवश्यक आहेच परंतु याहीपेक्षा महत्त्वाचे आहे मराठी भाषेसाठी असणारा आदर, प्रेम तसेच तिची समृद्धी वाढविण्याची प्रामाणिक इच्छा.

आम्ही घरी मराठीतच बोलतो, त्याचा सुरेख परिणाम समोर आला, तो असा की माझी दोन्ही मुले शिक्षणासाठी पुण्यात गेली  तर त्यांना भाषेचा त्रास न होता इतर काम सुद्धा लवकर पूर्ण होतात. आजच्या दिवशी आपल्या मातृभाषेचा मान राखणे गरजेचे आहे.

२. हेच खरे स्वप्न

वडिलांना नेहमी वाटायचे आपले कसे होणार पुढे, देवाने दोन्ही मुलीच दिल्यात. पण परिस्थिति प्रमाणे दोघीजणी वारंवार अभ्यास करून पुढे शिकत गेलो. लगेच त्याच हिशोबानी आम्हाला नौकरीसुद्धा मिळाली. देवकृपेने सर्व गोष्टींना सामोरे जाऊन, लग्नविधि पूर्ण होऊन छान पार पडले.

मध्यंतरी वडिलांना पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे सर्जरी साठी सामोरी जावे लागले. अगदी दोन्ही जावयांनी मुलासारखी सेवा केली. ते सुखरूप घरी आले, आईची पण काळजी  मिटली होती. तेव्हांच माझे येजमान नवीन कार घेऊन आले, आणि म्हणाले, “चला देवी दर्शनाला निघुया आपण”. हे ऐकून माझे आई-वडिलांनी  पहिल्यापासून बघितलेलं स्वप्न आज खरया रूपात सामोरी आले , “तू माझ्या सत्यात उतरलेले चिरंतन गोड स्वप्न आहेस”.”हेच खरे स्वप्न”.

३. नवीन रंग रूपात वाट सुरूच असते

रंगात रंगली होळीच्या स्वप्नात ती हरवून गेली होती पूनम, आता मागच्या वर्षीतर हे माझ्या अगदी बरोबरच होते. जीवनाच्या प्रत्येक क्षणात होळीच्या विविध रंगा सारखा कोणत्या ही परिस्थितित मस्त राहून साथ देणारा दोघी मुलींन्ना अतिशय प्रेम करणारा नीरज आज देवा जवळ गेला, तरी ती हे सत्य  तिचे मन स्वीकार्य नव्हत करत, फार खचून गेली होती.

पण तिच्या दिरांनी मदत  केली आणि तिने स्वताला आत्मसंबल देऊन नौकरीसुद्धा केली. पुढे जाऊन मुलींचे शिक्षण, लग्न सर्व सुखरूप पार पडले. जीवनातल्या या क्षणात तिने  फार आत्मविश्वासाने मोकळा श्वास घेतला होता. मनात विचार करते, स्त्रीची ही जीवनयात्रा कधीच संपत नाही, कोणता तरी नवीन धडा घेऊन सप्तरंग-इंद्रधनुषाच्या रंगरूपात वाट सुरूच असते.

४. प्रकाश (मराठी कविता)

दिव्यांचा पसरला सर्व दूर प्रकाश

आनंदाचा आहे चहु कड़े वास
दिवाळीच्या  सणात  झाला आहे
सर्वान बरोबर गोडी चा सहवास

घर स्वच्छ ठेवण्या ऐवजी
आपले मन स्वच्छ ठेवा
दिवाळीतच नव्हे तर नेहमीच
लक्ष्मी आपोआपच
येईल तुमच्या कड़े

सर्व घरी नैवेद्य अर्पित केला आहे
लक्ष्मी पूजा झाली आहे
प्रत्येक घरात घरच्या लक्ष्मीनी
हा  सुयोग्य अवसर आणलेला असतो
तर त्या लक्ष्मी चा मान राखा जपून
तरच धनलक्ष्मी पावेल तुम्हाला
तुमचा मान राखून

याच बरोबर त्या मातांना
वारंवार नमस्कार
ज्यांचे मुले  व मुली

जे सिपाही च्या रूपात
देशाची सेवा करीत आहेत
आणि आम्ही  निवांत
घरी दिवाळीचा प्रकाश रूपी
सण साजरी करतो

Disclaimer: The views, opinions and positions (including content in any form) expressed within this post are those of the author alone. The accuracy, completeness and validity of any statements made within this article are not guaranteed. We accept no liability for any errors, omissions or representations. The responsibility for intellectual property rights of this content rests with the author and any liability with regards to infringement of intellectual property rights remains with him/her.