कथा आयुष्याच्या
१. नवा आरंभ
देवापुढे सविता रडत होती, यजमान वारल्या नंतर एकटी पडली होती. तिची फार इच्छा होती, एकदा तरी मेघाला सासरच्यांनी गुढीपाडव्याच्या सणाला माहेरी येऊ द्यावे. ती विचारच करत होती, इतक्यात बेल वाजली, जावई बापू, लेक आणि लहान बाळासह सामोरी उभे! अगदी खरे स्वप्ना-सारखे. तिने औक्षण केले. जावयांनी गुढी उभारली. बऱ्याच दिवसांनी, घरात पालवी चैत्राची, गुढी प्रगतीची, उगम चैतन्याचा, सोहळा आनंदाचा, अंकुर सृजनाचे, बहर वसंताचे, ध्यास कल्पनेचे, नाविन्याचे आरंभ पसरलेले होते.मेघा म्हणली, “आई,चैत्रगौरीचच्या हळदी-कुंकवाचा समारंभ आपण शेजारच्या बायकांबरोबर एकत्र साजरा करूया, मग जाईन मी, तुझी केव्हाची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठीच तर मी आले आहे नं!”
२. नववर्षाचे शुभारंभ
ऋतू बदलाच्या सृजनशील हिरव्यागार सदिच्छा! जुने साचलेले कुबट आतून जावून नविन लसलसणारे चैतन्यमय असे काही तूमच्या मनामनात रुजावे हीच चैत्र पाडव्याच्या निमित्ताने देवाजवळ प्रार्थना.पाडव्याचा विशेष संदर्भ महणजे, रामायणातील, प्रभु श्रीराम या क्षत्रिय राजाने रावण या ब्राह्मणाचा पराभव करून त्याचा वध करून विजय मिळविला. अशा श्रीरामाचे लक्ष्मण, सीता, हनुमान व इतर वानर सैन्यासह अयोध्येत आगमन झाले तो हा दिवस. या दिवशी अयोध्येतील जनतेने मोठ्या आनंदाने आपआपल्या घरासमोर गुढ्या उभारल्या. तोरणं बांधली. रांगोळ्या काढल्या. म्हणून अशी ही चैत्र-पालवी, अखंडता स्नेहाची, जपणूक परंपरेची, उंच शुभ-गुढी आदर्शाची, संपन्नेतीची, उन्नतीची, मराठी नववर्षाचे शुभारंभ साजरा करण्यासाठी दर वर्षी घरो-घरी आनंदाने उभारली जाते.
३. नेहमीच सावध राहणे गरजेचे
एकदा माझे काका-काकू जीटी एक्सप्रेसने बेंगलूर हून भोपाळला येत होते, गाडीत खूपच गर्दी होती, म्हणून स्टेशनवर उतरू शकले नाहीत. बाबा घ्यायला गेले होते, त्यांनी सामान बरोबर घेतले. तेवढ्यात गाड़ी सुरू ही झाली हो, आणि काकू उतरू शकल्या नाहीत. दारासमोरच उभ्या राहून काकांची वाट पाहू लागल्या. ती अगदीच काही करूच शकली नाही, नाइलाज होता.इकडे काकांना सुद्धा काळजी लागून राहिली, उतरताना चुकामूक झाल्याने त्रास झाला. कसातरी स्टेशन वरून संपर्क साधला, आणि पुढील स्टेशनावर उतरायला सांगितले. ते दूसरी गाड़ी पकडून तेथे पोहोचले. नंतर मग दोघे-सुखरूप घरी आले. मित्रांन्नो तुम्ही सर्व नक्कीच प्रयत्न करा बरं का, अशी गड़बड़ कुणाचीच व्हायला नको.
Disclaimer: The views, opinions and positions (including content in any form) expressed within this post are those of the author alone. The accuracy, completeness and validity of any statements made within this article are not guaranteed. We accept no liability for any errors, omissions or representations. The responsibility for intellectual property rights of this content rests with the author and any liability with regards to infringement of intellectual property rights remains with him/her.