जीवनात बदल महत्वाचा आहे

जीवनात बदल महत्वाचा आहे

लिहिण्‍या पूर्वी सर्वांना माझा सप्रेम नमस्‍कार. मी ह्या आधी सुद्धा ३-४ ब्लॉग्स लिहिले आहेत, आशा करते की माझे विचार तुम्‍हाला नक्‍की आवड़तील.

बदल आताच्या तांत्रिक युगात अगदी गरजेचे ठरले आहे. बदलांची सुरुवात आधी आपण घरापासूनच करतो नाही का ? माझे ह्यासंदर्भात व्यक्तिगत मत असे आहे की, आपल्‍या जीवनात  जसजसे पुढ़े पाऊल टाकत जातो, तसतसे अनुभव येत जातात आणि मग त्‍यात बदल करून सुधारणा केली जाते.

आता  घरातून सूरूवात केलीस आहे मी, तर तुम्‍हाला एक साधारणच उदाहरण सांगते की, मी लहानपणा पासून आई कड़ूनच शिकले  की  स्‍वयपाकात सुद्धा रोज आपण वेग-वेगळे चवीष्‍ट पदार्थ करतो, ते जर एक सारखेच केले तर आपण खाऊ शकत नाहीआणि  रुचकर पण  लागणार नाही. तर ती चटण्‍यापासून सगळे पदार्थ विविध रूपात करायची. जसे स्वयंपाक रुचकर होण्यासाठी आणि तो  सर्वांचा आत्‍मा तृप्‍त करण्‍या साठी आपण निर-निराळे प्रयोग करतो मग तसे ह्या काळात सर्व क्षेत्रात पण आपण बदल घडवू शकतो.

दिवसेंदिवस आपण पाहतो आहे की हा जो काळ चालला आहे तो पूर्णपणे प्रतिस्‍पर्धेच्‍या श्रेणीत बहरून पुढ़े वाढ़तो आहे, जर आम्‍ही त्‍यात बदल नाही केला तर मग आम्‍ही प्रगतिच्‍या मार्गावर पोहचू शकणार नाही. माझे तर हे मत आहे की कोणतीही नवीन सुरुवात स्वतःपासूनच सुरू होते म्‍हणून जेव्हा आधी आपण बदल घड़वून आणू तेव्हाच आपण आपल्या मुलांना पण गरजेनुसार बदलाची सवय लावू शकतो.

कुठलाही बदल घडवण्यासाठी त्याच्या दोन्ही बाजू समोर ठेवाव्या आणि मग प्रामाणिक पणे विचार करून निर्णय घ्यावा. बदल म्हणजे कोणत्‍या  ही रूपात घड़णारी एक क्रिया म्हणू शकतो, मग तो निसर्ग असो, माणूस असो, संस्‍था असो किंवा घर असो, जशी प्रकृति बदलते तशीच परिस्थिति सुद्धा बदलते,  नेहमी एक सारखे राहणे शक्‍य नसल्‍या मुळे  प्रत्‍येक परिस्थितिच्‍या सामोरी जाणे भाग असते आणि त्‍याच्‍या  शक्यतेवर आम्‍ही सतत प्रयत्‍नशील ही असतो. मग सर्व बिंदु सामोरी ठेऊन ज्‍या बदलामुळे चांगले परिणाम मिळतात ते गतिशील करत जातो आणि ज्‍या बदला मुळे परिणाम ही वाईट येऊन जर त्रास होत असला तर मग त्‍याचात काही सुधार व्‍हावा म्‍हणून काही नवीन बदल करता येतो नाही का ?

आता मी येथे आपला अनुभव सांगते सर्वांना की संस्थेमध्ये पूर्वी आम्‍ही टायपिंग मशीनवर टाईप करायचो बर का आणि स्‍टाफ ही कमी, फक्‍त ३५-४० जणांचा स्‍टाफ. मग  ८-९ वर्षानंतर एक नवीन अधिकारी आले, मग त्‍यांनी हा विचार केला की  संस्‍थेचे काम  आता खूपच वाढ़त  चालले आहे तर  असे काही केले पाहीजे की काम ही लवकर होऊन वेळ ही वाचेल आणि त्‍याच कमी वेळात स्‍टाफ कड़ून जास्‍त काम करून घेण्‍या करिता सर्वांना कम्‍प्‍यूटरवर काम करण्‍या करिता तयार केले. त्‍याच प्रमाणे दिवसेंदिवस वेळे प्रमाणे इंटरनेटच्‍या सर्व सुविधापण संस्‍थे साठी गरज म्‍हणनूच केले. आम्‍हाला पण ते सर्व शिकणे गरजेच होते, तेथे  असे म्‍हणून चालत नाही ना, म्‍हणूनच आम्‍ही म्‍हणतो “बदल हा प्रकृतिचा नियम आहे”. त्‍या अधिकाऱ्याला माहित होते  असे बदल केले तरच संस्‍थेची उन्नती मिळवून त्‍याच बरोबर सर्वांची सुद्धाउन्नती नक्‍की होणारच. आज त्‍या  बदलामुळे मी माझे लेखन सुरळीत पार पाड़ते मग ते हिंदी भाषा असो किंवा मराठी ” वेळे  आणि गरजे प्रमाणे आपल्‍याला बदलणे आवश्‍यकच असते” नाही तर मनुष्‍य पुढ़ील प्रगति करूच शकत नाही.

आजकाल तर हो नेटवर्किंगचाच काळ म्‍हंटले तर काहीच अतिश्‍योक्ति होणार नाही,  शाळेच्या मुलांपासून कॉलेजच्या मुलांनासुद्धा सुद्धा त्‍यांचे प्रोजेक्‍ट आणि इतर क्रियाकलाप कंम्‍प्‍यूटरवरच नेटचे वापर करून पूर्ण करावे लागतात. त्‍याचे कारण हेच आहे की प्रतिस्‍पर्धे साठी पोरांना वर्तमान युगा मधे पुढ़े जायचे गरजेचेच आहे, त्‍यामुळे शिक्षक त्‍यांना बदल घड़वूनच तयार करतात, कारण आपण एरवी आपसातच म्‍हणतो आणि मी  कित्येक जणांनी म्हटलेले ऐकले आहे की हल्‍ली पूर्वी सारखे काहीच राह्यलेले नाही हो, अरे असे बोलण्याच्या आधी हा तर विचार करा की तुम्ही तरी आहेत का पाहिल्यासारखे ? मग दिवसेंदिवस काळ बदलला की अशा सर्व गोष्टींमध्ये बदल घडणारच हो

सर्व पालकांना आपल्‍या पोरांना काळाच्‍या बदल प्रमाणे शिकवण पण देणे गरजेचेच आहे, मग तो मुलगा असो किंवा मुलगी. आजकाल आपण  पाहतो की महागाई किती वाढ़त चालली आहे, त्‍यामुळे घरात सुद्धा आई-वडिल दोघांना कामावर जाणे गरजेचेच झाले, म्‍हणूनच घरात सुद्धा जर सर्व एकत्र कुटुंब जर राहात असेल तर पूर्वी च्‍या काळाशी तुलना न करिता आत्ताच्या गरजे प्रमाणे बदल आवश्‍यकच आहे. हे काही एका माणसाचे काम नाही, घरातल्‍या सर्वांनी आपली-आपली जवाबदारी समजून बदल घड़विण्‍याचा प्रयत्‍न केला पाहिजे. आपल्‍याला मुलगा असो  किंवा मुलगी त्‍यांना अगदी वेळेप्रमाणेच घरातल्‍या कामांची सुद्धा सवय लावा,  असे म्‍हणून चालणार नहीं बर का, की तो मुलगा आहे तर करणार नाही, आजकाल त्‍यांना शिक्षणासाठी  किंवा नोकरीसाठी किंवा काही व्‍यवसाया साठी बाहेर जावेच लागते, तर त्‍यांना  आधीपासून जर सवय असेल तर काहीच त्रास होणार नाही हो.  त्‍याच बरोबर काळाप्रमाणे त्‍यांची चूक सांगावी,  समजवावे आणि‍ त्‍याच बरोबर वस्‍त्र कोणते ही घाला  पण व्‍यवस्थित दिसले पाहीजे हे सांगा. समाजात बाहेर पड़ायाचे आहे तर काय खरे आणि काय खोटे सगळ शिक्षण व संस्‍कार द्यायचा प्रयत्‍न करावा, आधीचा काळ तसा नव्‍हता हो,  आता वेळे प्रमाणे  चांगल्‍या आणि वाईट गोष्‍टींचे परिणाम सुद्धा जर समजवून सांगितले तर पोरांना तर नक्‍कीच या समाजात बदल घड़वून येणारच, ही मला नक्‍की खात्री आहे.

मित्रांनों बदल हा महत्‍वाचाच ह्याचावर मी आपले अनुभवाने व्‍यक्तिमत ठेवत आहे, तसे प्रत्‍येकाचे विचार वेगळे  असू ही शकतात. पण मित्रांनो  जसे मी वर सांगितलेस आहे की बदल हा जर तुम्‍हाला प्रगति मार्गावर नेणारा असेल तर तो नक्‍की घड़वायला काहीच हरकत नाही पण ना आजकालच्‍या काळात लग्‍नांच्‍या पद्धती सुद्धा बदलल्‍या  आहेत, तर त्‍याचात सुद्धा वेळे प्रमाणे निर्णय घेऊ शकतो. पण  पाश्‍चात्‍य  पद्धती बघून ते खूप वेळ  डान्स करणे, वरात काढ़ून रस्‍ता जाम करणे हे अगदी बरोबर नाही, जो पाहिजे तो बदल घड़विण्‍या साठी आपली संस्‍कृति नाही सोडायची, हे ही तितकेच खरे आहे नाही का ? आजकाल सर्वांना वेळेची कमतरता असल्यामुळे आपण  लग्नाचे विधि‍ कमी करू शकतो,शक्यतोवर अगदी जवळच्‍या नातेबाइकांना बोलावू शकतो आणि नको तो खर्च टाळू शकतो नाही का ? हा बदल जरूर करू शकतो.

हल्‍ली च्‍या काळा प्रमाणेच सणवार सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणात न करिता कमी प्रमाणात पण आम्‍ही करू शकतो, नाही का ? म्‍हणजे की जसे तुम्‍हाला सोईस्‍कर जाईल  तसेच सण साजरे करा. आजकाल सर्व व्‍यस्‍त जीवन झाल्‍यामुळे सर्वांनाच हा विचार प्रत्‍येक क्षेत्रात केलाच पाहीजे नाही का ?

माझे  असे मत आहे की समाजा मधे सुद्धा जेथे समाज कल्‍याण  होत असेल  तो  बदल करता येईल तर तेथे केलाच पाहीजे. बदल म्‍हणजे कोणाला ही मानसिक त्रास देणारा बदल नव्‍हे. बदल म्‍हणजे ज्‍याच्‍या पासून जर  मानसिक शांती मिळत असेल तर तो  बदल करायला काहीच हरकत नाही.

तर मित्रांनो कसे वाटले माझे विचार, आपले मत सांगाल मग नक्‍की.

Disclaimer: The views, opinions and positions (including content in any form) expressed within this post are those of the author alone. The accuracy, completeness and validity of any statements made within this article are not guaranteed. We accept no liability for any errors, omissions or representations. The responsibility for intellectual property rights of this content rests with the author and any liability with regards to infringement of intellectual property rights remains with him/her.

Previous article «
Next article »