काही मनातल्या गोष्टी

काही मनातल्या गोष्टी

१. माझे पहिले संभाषण

नवोदय विद्यालय समिति, ह्याची स्थापना पूर्व-पंतप्रधान स्व.राजीवगांधींजींने करून गावातल्या पोरांच्या शिक्षणासाठी केलेली नवीन सुरूवात होती. त्याच ऑफिस मधे काम करायचे मी. नवीन-नवीन होते म्हणून  कामाचे खूपच लोड होते आणि स्टाफ कमी असल्या मुळे टीम वर्क प्रमाणेच सर्व-काम करावे लागायचे. एकाएकी साहेबांनी सांगितले, सगळ्या  विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक समारंभ संचालित करायचे आहे आणि ह्यासाठी टीम बनवली, त्याच बरोबर अँकरिंग करायला मलाच सांगितले.

तशी  मी शाळेत्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे, पण हा माझा पहिलाच अनुभव. मैत्रीणीने उत्साह वाढ़वला  माझा. मग काय हो, शेवटी तो दिवस उगवला, ज्याची  सर्व आतूरतेने वाट बघतस होते. पहिल्यांदा सर्वानसमोर मंचावर शाळ्यांच्या-विकासार्थ माईकवर मी संभाषण केले, दर्शकांनी टाळ्यांच्या-रूपात शाबासकी दिली.

२. आई कडून मिळालेले संस्कार

माझी आई स्वयंपाक खूपच चविष्ट करायची. सर्वांना तिने केलेला कोणताही पदार्थ अवड़ायचा . मलापण स्वयंपाकाची अवड़ लहानपणा पासूनच होती. मी मोठी होते म्हणून आईला सर्व कामे करायला मदत करायचे. अभ्यासाबरोबरच, पत्र लिहायाला शिकवण्यापासून इतर सर्व काम आणि संस्कार मला आई कडूनच मिळालेले आहे.  सर्वात महत्वाचे म्हणजे जीवनात नेहमी स्वाभिमानाने खऱ्या  मार्गावर चालायचे, घरात स्वच्छतेने काम करून वस्तू ,कपड़े जागेवरच ठेवायचे, जशी वेळ येईल त्याप्रमाणे राहायचे.

माझे पोर उन्हाळ्याच्या सुट्टीत आईकड़ेच राहायचे आणि मस्तपैकी खायचे. आज मला सासरी सर्व म्हणतात, आई सारखीच हसत राहते, त्याच बरोबर  पुरण-पोळी अगदी चविष्ट आणि इतर  स्वयंपाक खूपच छान करते. अन्नपूर्णा प्रसन्न आहे,हेच आईकडून मिळालेले संस्कारा पोरांना शिकवत आहे.

३. जीवनातली गोड़ आठवण

लव मॅरेज झाले चुलत बहिणीचे, तेव्हा जास्त थाटात लग्न नाही होऊ शकल्या मुळे तिच्यात आपल्या मुलाचे लग्न अगदी आनंदात करण्या साठी अतिउत्साह भरलेला होता. लग्ना पूर्वी तिने आपल्या नातेवाईकांबरोबर  डांस परफॉर्मन्स ठेवले, तिची मनापासून इच्छा होती, गुजराती-ड्रेस घालून डांस करायची. तिच्या सोबत डांस करायला आम्ही बहिणीपण आतुरतेने तयार होतो, मला सुद्धा हौस होती, पण एकदम छान येत नव्हते. तर ती म्हणाली, आपण वेगवेगळ्या स्टेप करूया न.

तिच्याच बरोबर आम्ही बहिणी मनसोक्त मनापासून नाचलो. ह्या विशेष समारंभात सगळेच रमले हो, इतरवेळी कोणी करत नाही, यजमानांनी  माझी इच्छा पुरवली. आम्ही हातात हात गुंफून अगदी हृदयापासून नाचलो, हीच आमच्या जीवनातली गोड़ आठवण नेहमीच मनात जिवंत आहे.

४. आशीर्वादरूपी तुझे आभार

खरंतर आईला मी सगळ्या गोष्टी सांगत होते. पण, एक गोष्ट आहे जी मी आजपर्यंत तिला सांगू शकले नाही. तुझ्यामुळे मी आहे, हे तर तुला माहीतच आहे आई.  मी जशी पण आहे, आज ते तुझ्यामुळेच खंबीर उभी  आहे. लहानपणापासून तू दिलेल्या मौल्यवान संस्कारा बरोबरच जीवनाच्या उन्हाळ्यात पावसाळ्यात, तूच वागल्याप्रमाणे मी पुढचे पाऊल टाकले. मला नोकरी लागली तेव्हा, बाळंतपणाच्या वेळेस आणि कोणत्याही कठीण परिस्थतीला सामोरी जाताना तूच माझी  मैत्रीण बनून माझ्या सोबत होती.

ह्या जीवनात माझ्यासाठी देवांच्या ही आधी तुझे स्थान सर्वश्रेष्ठ आहे, “आई-तुझे-खूप-आभार” म्हणून त्याची पूर्ती  कधीच होणार नाही तुझ्या संस्कारांना आमच्या मुलांमध्ये जिवंत ठेवू,  तुझे हेच आशीर्वादरूपी आभार नेहमीच असूदे .

Disclaimer: The views, opinions and positions (including content in any form) expressed within this post are those of the author alone. The accuracy, completeness and validity of any statements made within this article are not guaranteed. We accept no liability for any errors, omissions or representations. The responsibility for intellectual property rights of this content rests with the author and any liability with regards to infringement of intellectual property rights remains with him/her.

Previous article «
Next article »