प्रेमाची गोष्ट

प्रेमाची गोष्ट

Last Updated on

हा लेख आजकालच्या तरुण पिढीमध्ये होणाऱ्या वाढत्या घटस्फोटाबद्दल आहे.

आपण नेहमी ऐकतो की बघा तिचा नवरा तिच्यावर किती प्रेम करतो. तिला कँडल लाईट डिनरला नेतो, नवीन नवीन कपडे देतो, घर कामात मदत करतो. नेहमी बायका आपल्या नवऱ्याची तुलना दुसऱ्या नवऱ्यांशी करत राहतात. ह्याला तर कुठे ना कुठे फेसबुक, व्हाट्सअप सारखे सोशल मीडिया जबाबदार आहेत. कारण त्यावरचे दुसऱ्यांनी टाकलेले फोटो बघून बऱ्याच बायकांना वाटतं कि खरंच ती बाई किती लकी आहे आणि मी किती दुर्दैवी आहे.

पण बघायला गेलो तर वास्तविक आणि काल्पनिक जीवनात खूप फरक आहे. प्रेमाची गोष्ट पुस्तकात आणि सिनेमात खूप छान वाटते पण खऱ्या आयुष्यात प्रेमासोबत जबाबदारी असते. सगळी जबाबदारी निभावताना प्रेम हेच पुरेसं असते कारण प्रेमा सोबत लागतो एकमेकांवर विश्वास आणि समजूतदारपणा!

माझं लग्न होऊन ६ वर्षे झाली. सुरुवातीला मला ही असच वाटायचं कि खरंच कि माझाही नवरा माझ्यावर प्रेम करतो कि नाही कारण माझा नवरा मितभाषी आहे आणि भावना व्यक्त करता येत नाहीत.

पण नंतर मला हळू हळू कळू लागले कि प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची पद्दत वेगवेगळी असते आणि नको माझ्या नवऱ्याची तुलना दुसऱ्या व्यक्तीशी!

तसा माझ नवरा खूप चांगला आहे. नको म्हटल्यावरही मला घरकामात मदत करत. त्याला माझ्यावर प्रेम आहे हे व्यकत करता येत नाही पण माझ्यासाठी तो बेचैन होतो आणि त्याचं माझ्यावर किती प्रेम आहे हे दिसून येते.

भले ही तो मला गिफ्ट देत नसेल पण काही मागितल्यावर नाही सुद्धा म्हणत नाही आणि पुढच्या वेळी ते मागण्या च्या आधी आणून देतो. भलेही मला कँडल लाईट डिनरला मला तो नेत नसेल पण जेव्हा ही मला जेवण बनवायचा कंटाळा येतो तेव्हा तो मला बाहेर घेऊन जातो. तो बोलत नाही पण नेहमी माझं बोलणं आणि बडबड ऐकत असतो. तो माझी तारीफ करत नाही पण नेहमी म्हणतो जर आपल्याला मुलगी झाली तर ती तुझ्यासारखीच व्हायला हवी. अशा खूप गोष्टी असतात ज्या नवरा बायकोसाठी करत असतो पण आपल्या लक्षात येत नाही.

संसार म्हटल्यावर तिथं दोघांनी एकमेकांना समजून घायला पाहिजे. प्रत्येकाची प्रेमाची भाषा वेगळी असते फक्त ती समजून घ्यायला हवी. संसाराच्या सुरुवातीला नवऱ्यावर निरपेक्ष प्रेम केल्यावर, त्याचा विश्वास जिंकल्यावर पुढे आयुष्यभर तो सुद्धा पूर्ण आयुष्य तुमच्यावर प्रेम करेल. दोघांनी एकमेकांची प्रेमाची भाषा समजून सुखा दुःखात एक दुसऱ्याची साथ दिली तर संसार सुखाने आणि समाधानाने पार पडणे अवघड नाही.

Disclaimer: The views, opinions and positions (including content in any form) expressed within this post are those of the author alone. The accuracy, completeness and validity of any statements made within this article are not guaranteed. We accept no liability for any errors, omissions or representations. The responsibility for intellectual property rights of this content rests with the author and any liability with regards to infringement of intellectual property rights remains with him/her.

Previous articleHow a Paediatric Endocrinologist Can Help Your Child
Next article50 Best Flower Names for Boys