Magazine

माझ्या मुलीला लिहिलेलं पत्र

माझा प्रिय वडापाव,

ADVERTISEMENT

हॅपी बर्थ डे! ❤️❤️

येस, वडापाव ह्याकरता कारण तुझे गाल आणि चेहरा एकंदरीत मला वडापाव सारखा दिसतो आणि येस वडापाव तुझ्या बाबांना आणि मला प्रचंड आवडतो… 

ADVERTISEMENT

लॉकडाऊन मुळे आपल्याला गेल्या वर्षी जो वेळ एकत्र घालवता आला नाही तो ह्या वर्षी आपण सोबत घालवला

ADVERTISEMENT

सुरुवातीला तू मला खूप त्रास दिला.कारण घरात २४ तास राहायची तुला सवय नव्हती. पण एक दिवस मी तुला नीट समजावून सांगितलं … बस,त्या दिवसापासून काय झालं मला नाही माहिती पण तू कधीही मला बाहेर जाण्यावरून त्रास दिला नाहीस.शहाणं ते बाळ माझं.

ADVERTISEMENT

गेल्या वर्षात तू इमोशनली खूप डेव्हलप झालीस. आजकल तुला माझ्या बोलण्यातला आवाजाचा चढ उतार ऐकून कळतं की मला काय बोलायचं आहे आणि मी तुला काय सांगत आहे. हेच नाही तर कधी कधी मी फक्त, ” अगं कस्तुरी मला हे देतेस का ? ” असं बोलते.पण ते ‘ हे ‘ काय आहे हे तुला मात्र चटकन कळते.लॉकडाऊन च्या काळात असं कित्येकदा झालं की मला सगळं एकटीने करून कंटाळा आला.आणि तेव्हा तू च फक्त होतीस जी म्हणायची ” आई, तू दमली आहेस का ? नसेल करायचं काम तर राहू दे.मला काहीच प्रॉब्लेम नाही.आपण दोघी नंतर करू..चालेल तुला ? आणि मी म्हणायचे ” अरे हिला कुठून कळतं की मी दमली आहे ते ? …

ADVERTISEMENT

मला कधीपण लागलं की तू येऊन बोलायची “आई बघू कुठे लागलं तुला ? थांब तुला मी रात्री झोपताना औषध देईल म्हणजे तुला बरं वाटेल”..त्यावेळी डोळे भरून यायचे. वाटायचं आई असच बोलली असती मला.तुझी जितकी काळजी मी करते तेवढाच जीव तू मला आणि तुझ्या बाबांना लावतेस. बाकी सगळं काही असो पण जीव लावण्याची सवय मात्र तू माझी घेतली आहेस हे नक्की. मला बरं वाटतं आहे का हे तुझ्या बाबांना कित्येकदा माहिती पण नसतं पण तू मात्र आई तुला बरं आहे का ? अशी रोज माझी आवर्जून चौकशी करतेस…खूप बरं वाटतं अशा वेळी. कुणीतरी हक्काचं खूप जवळचं माणूस आहे माझ्याकडे म्हणून मन भरून येतं माझं.

ADVERTISEMENT

तू जितकी भावनिक आहेस, तितकी च तल्लख बुद्धी देखील आहे तुला. कुठली गोष्ट , कुठला संदर्भ कुठे कसा वापरायचा हे तुला अगदी बरोबर कळतं. ह्या वर्षी तू टॉकिंग टॉम अँड फ्रेंड्स हे कार्टून तू इतकं पाहिलं, की तू, अगदी उत्तम रित्या इंग्लिश बोलू लागली..दॅट वॉज द बिगेस्ट सरप्राईज फॉर मी अँड बाबा.आणि नुसतं बोलणं च नाही तर तसा ऍक्सेंट पण तू आत्मसात केलास..अँड आय एम प्राऊड ऑफ यु फॉर थिस. आपली बोली भाषा कशीही असो, आपल्याला नेहमी चांगली मराठी आणि इंग्लिश बोलता यावी ह्या मताची मी आहे. आणि तुझी ओव्हरऑल इंग्लिशची प्रगती पाहून मला खूप आनंद झाला. जितकी चांगली तू इंग्लिश बोलतेस तितकं च तुझा मराठी वर देखील प्रभुत्व आहे हे नव्याने सांगायला नको…तुझे ऑनलाईन सेशन्स सुद्धा तू आवडीने अटेंड करतेस. रोज काहीतरी नवीन शिकायला मिळणार हा आनंद तुझ्या चेहऱ्यावर असतो. आणि हाच नव्या गोष्टी शिकण्याचा आनंद तुला आयुष्यात खूप कामी येईल आणि तू खूप पुढे जाशील.

तू इमोशनल, हुशार तर आहेस च पण तू जीवनाचा मनमुराद आस्वाद घेणाऱ्या लोकांपैकी एक आहेस. जसे तुझे बाबा आहेत…खळखळून हसणं मी तुझ्याकडुन शिकले.असं नाहीये की मी कधी हसत नाही..पण तुझ्यामुळे मी निरागस पणे पुन्हा हसायला लागले. तुझा सेन्स ऑफ ह्युमर आणि प्रेझेन्स ऑफ माईंड फार मस्त आहे,अगदी तुझ्या बाबंसारखा आणि त्यामुळे मी किती जरी चिडले असले, तरी तुझ्यावर फार काळ चिडू शकत नाही. तुला रोज रात्री गोष्ट ऐकल्याशिवाय किंवा तुझी आवडती अंगाई ऐकल्याशिवाय झोप येत नाही.  एकंदरीत काय तर तू रसिक आहेस. तुला आमच्या दोघांमुळे बरीचशी जुनी गाणी देखील माहीत आहेत आणि वेळोवेळी तू ते घरात गुणगुणत देखील असतेस.  

ADVERTISEMENT

आपण साधारण दिवाळीला गावी जाऊन आल्यावर, डिसेंबर ते फेब्रुवारी, दर वीकएन्डला बाहेर,अगदी बाहेर फिरायला जायचो त्यात आपण भिगवण ला पक्षी निरीक्षणाला गेलेलो. तिथे तू चक्क पक्षी निरीक्षण केलंस आणि तायतली किती तरी नावं तुला आज देखील लक्षात आहेत. आपण शिवनेरी आणि सिंहगड ला गेलेलो, तिथे तर तू पूर्ण गड चढून आणि उतरून आलीस.ह्या वर्षी मी आणि तुझ्या बाबांनी तुला खूप काही ठिकणी नेलं. आणि मॉल्स पेक्षा तू त्या सगळ्या ठिकाणी खूप एन्जॉय केलं. मला नेहमी वाटतं की तू सगळ्या प्रकारचं आयुष्य जगावं. आणि त्यातलं बरच काही तू ह्या वर्षी पाहिलं आणि तसं जगलीस. टीव्ही आणि मॉल्स मध्ये रमणारी तुम्ही मुलं, पण तू वेगवेगळी धरणे पाहिली, पाणी खेळणं, गड किल्ले चढून जाणं, पक्षी बघणं, बाहेर कुठेतरी मोकळ्या जागेत शेतात जाऊन डब्बा खाणं, रस्त्याने गाणे गुणगुणत जाणं, राईड एन्जॉय करणं, शेतात जाऊन भाज्या कशा येतात ते पाहणं, .. असं बरच काही तू ह्या वर्षी केलंस आणि पाहिलंस.. आणि अनुभवलं…

दरवर्षी प्रमाणे तुझ्या खाण्याच्या आवडीमध्ये अजून भर पडली आहे. इतकी की तुला अल्मोस्ट कोणत्या भाजीमध्ये काय घालता हे माहिती आहे. फोटोग्राफी हा तुझा नाव छंद आहे. लॉकडाऊन मध्ये मी फूड फोटोग्राफी करायला लागले. आजकाल माझ्या आधी तू, फोटो काढताना जे काही सामान मला हवं असतं ते आधीच आणून देतेस आणि काही वेळा तर चक्क तू कॅमेरा ने फोटो देखील काढून पाहतेस. कित्येकदा त्यातल एखादं सामान तू पळवते आणि मग माझे बोलणे सुद्धा खाते. तितकी तशी मस्ती करणारी आहेस च तू. जशी मस्ती करतेस तितकी च समजूतदार सुद्धा आहेस तू. तुझ्या वयाची किती मुलं हट्टीपणा करतात. मला हे हवा मला ते हवं म्हणून काही ना काही सतत मागत असता. पण तू मात्र तशी नाहियेस. तू कधीतरी मला आणि बाबांना बोलताना ऐकलं होतं. ते मला  विचारत होते की तुला बर्थ डे ला काय हवं आहे ? आणि मी बोलले होते की मला नको काही, आहे सगळं माझ्याकडे. ते वाक्य तू इतकं लक्षात ठेवलं आहेस की, तुला आम्ही कधीपण काहीपण विचारलं की तुला काही हवंय का ? तर तू एकदा चेक करते आणि बोलतेस, ” नको आई/बाबा, हे आहे माझ्याकडे, अगोदर हे संपू द्या मग आपण नवीन काही घेऊ. मला आत्ता काही नको आहे.” हे ऐकून मला तुझा खूप अभिमान वाटतो. अँड आय लव्ह यु अ लॉट फॉर थिस!. तुझ्या अशा काही वागण्याने तुझ्या रोज प्रेमात पडते मी आणि अजून रोज तुझ्यामधली नवीन ‘ तू ‘ मला सापडते….नव्याने…पुन्हा…

ADVERTISEMENT

असो, माझ्या भाषेत बोलायचं झालं तर तू पिझ्झा च्या स्लाइस सारखी आहेस विच कॉम्प्लिट्स आवर फॅमिली. तू एक सद्गुणी, भावनिक, निर्मळ मनाची, उत्साही, बडबडी अशी लेक आहेस माझी…तुझी बडबड ऐकण्यात आणि तुला हाक मारण्यात माझा दिवस कुठे संपतो मला कळत देखील नाही. दिवसभर कस्तुरी हे नको करू, असं का केलं… माझं काम वाढवलं ना? असे एक ना अनेक वेळा तुझ्यावर ओरडुन, तुझा पसारा आवर असं म्हणून तुझ्या मागे पाळणारी मी , तू झोपी गेल्यावर मात्र  मला काही करमत नाही…थोडक्यात काय तर माझा दिवस तुझ्यापासून सुरू होतो आणि संपतो देखील तुझ्याकडेच…रात्री झोपताना “आई, सॉरी आता मी तुझं सगळं ऐकेल, तुला त्रास नाही देणार” असे रोज खोटे प्रॉमिस करणारी तू.  जेव्हा माझ्या कुशीत येऊन झोपते तेव्हा सुख म्हणजे हेच असावं असं वाटतं मला… 
अशीच रहा…मनमोकळी, मनमुराद, स्वतःच्या पद्धतीने जगणारी, आत्मविशवासपूर्वक, हळवी, लाघवी, प्रेमळ… माझी नन्या…माझा वडापाव..माझा कचुंबर.. आय एम प्राऊड ऑफ यु!

वाढदिवसाच्या तुला माझ्या ओंजळभर शुभेच्छा…..आणि माझी ओंजळ तुला देण्याकरता कधीच कमी पडणार नाही. 
आय लव्ह यू टू द मून अँड बँक

ADVERTISEMENT

तुला पुन्हा एकदा वाढदिसानिमित्त खूप खूप शुभेच्छा… येणाऱ्या वर्षाला खुल्या मिठीत सामावून घे…घट्ट पकड आणि वर्षा सरती तीच मिठी सैल करताना जे मिळेल, ती तुझी खरी कमाई… कमाई तुझ्या अनुभवाची, कमाई तुझ्या मेहनतीची, कमाई तू शिकलेल्या नव्या गोष्टींची …

वन्स अगेन हॅपी बर्थ डे माय लव्ह ❤️….

ADVERTISEMENT

तुझीच,

भेंडीची भाजी 
(जेव्हा मी तुला वडापाव म्हणून हाक देते, तेव्हा तेव्हा तू मला भेंडीची भाजी म्हणून हाक मारते)

ADVERTISEMENT

Disclaimer: The views, opinions and positions (including content in any form) expressed within this post are those of the author alone. The accuracy, completeness and validity of any statements made within this article are not guaranteed. We accept no liability for any errors, omissions or representations. The responsibility for intellectual property rights of this content rests with the author and any liability with regards to infringement of intellectual property rights remains with him/her.

This post was last modified on August 3, 2022 5:07 pm

Recent Posts

130+ Most Popular Indian Surnames or Last Names with Meanings

Indian surnames and last names are of great cultural and historical importance in India, revealing…

May 31, 2023

Baby Skin Care Ritual

Ah, babies! Those adorable little bundles of joy are guaranteed to steal your heart with…

May 29, 2023

Gas Problem After C-Section – Causes and Remedies

Pregnancy is a tough time for moms because it's challenging physically and emotionally and takes…

May 25, 2023

Diet for Autistic Children – Dietary Tips and Foods

Children diagnosed with ASD are known to have feeding problems when compared to other children.…

May 8, 2023

Toilet Training the Kids With Autism Spectrum Disorder

Toilet training can be a daunting task for the parents, and when it comes to…

May 8, 2023

Know Why Babies Born in May Are So Special

Babies born within a particular time frame tend to share certain traits that are interesting…

May 8, 2023