एक आई सर्व जगाशी लढणारी जीव पण दयायला तयार असणारी आपल्या पिल्यांसाठी

सकाळ ची वेळ होती. आम्ही सर्व मंडळी नाश्ता करायला बसलो.  काही वेळाने खूप ओरडण्याचे  आवज  यायला लागले . सर्व लोक आवाजाच्या दिशेने धावले. बघतात तर काय एक छोटंसं डुकराचं पिल्लू नाल्यात पडलेलं.  आमच्या घरामध्ये नाल्यावर वर झाकण नव्हते . कसं काय ते पिल्लू नाल्यात पडलं?. पिल्लाची आई त्याच्या आसपास जाऊन पिल्लाला  कसं बाहेर काढायचं ह्या  विचारात होती. एकीकडे आई ची पिल्लाला  बाहेर काढायची धावपळ  आणि दुसरीकडे नाल्यातील  थंड पाण्याने थथरून गेलेले पिल्लू . सर्व लोक जमा झाले. पण मदतीला कुणीच पुढे आले नाही, कारण पिल्लू डुकराचे होते . आपल्या कडे डुकरांना हात सुद्धा  लावयचा नाही असं  लहानपणा पासून शिकवलेले असतं ना ! मग कोण पुढे येणार?

पाहता पाहता दोन तास झाले. नाला  दोन फुट खोल असल्याने डुकराची आई सुद्धा पिल्लाला  बाहेर काढू शकत नव्हती . माझ्या आईला त्या दोघांची उडालेली तारांबळ पाहवेना कारण  ती पण एक आई आहे. ती एक काठी  घेऊन नाल्याजवळ जवळ गेली. तिने  खूप प्रयत्न केले पण ती पिल्लाला बाहेर काढू नाही शकली. शेवटी ती घरी परत आली. पिल्लाच्या आई चा ओरडण्याचा  आवाज अजूनही चालू च होता. माझी आई माझ्या जवळ आली आणि म्हणाली तू तरी जा आणि पिल्लाला  बाहेर काढ. मी त्या वेळी प्रेग्नन्ट होते  त्या मुळे मला जायला पाहिजे की नाही काही सुचेना. मग विचार केला चला एकदा प्रयत्न करू. मी गेले घराच्या मागच्या बाजूला. मी  एक लांब लाकूड घेतले, माझा विचार होता पिल्लाला  लाकडावर उचलायचे आणि बाहेर च्या दिशेला ठेवायचे.माझ्या हातात लाकूड बघून पिल्लाची  आई माझ्या दिशेनी धावयला लागली .मी थोडे घाबरले. मग मी विटांचा एक उतार तिथं बनवला, वाटलं ते पिलू त्यावर चालून बाहेर येईल. पण ते पिलू उताराच्या  च्या विरुद्ध दिशेने धावायचं. एक तास झाला होता माझ्या हाताला यश येईना. शेवटी मी त्या पिल्लाला  लाकडावर वर उचलले आणि बाहेरच्या दिशेने फेकले. जसं  ते पिलू बाहेर पडलं,  तसं  ते आई च्या दिशेने धावलं  आणि आणि तिच्या छातीशी घट्ट बिलगलं . तो क्षण माझ्या जीवनातला अविस्मरणीय क्षण आहे .

मी  जीवनात पहिल्यांदा कोणाचा तरी  जीव वाचवला. मी एका आई ला आपल्या पिल्लाशी भेट करून दिली. मग काही वेळ स्वतःचाच गर्व वाटायला लागला.  कारण  मी जीव जाणाऱ्याचा जीव वाचवला होता. काही महिन्यांनी माझी डिलिव्हरी झाली. पण माझी मुलगी  वाचली नाही तिचं हृदय पूर्णपणे तयार झालेले  नव्हते . ती दहा दिवसांत देवाघरी गेली . मग माझ्या डोक्यात खूप विचार यायचे की मी एक डुकराच्या पिल्लाचा  जीव वाचवला पण माझ्या पिल्लाचा  जीव कोणताच डॉक्टर वाचवू शकला नाही.  एका  वर्षातच मला दुसरं सुदृढ बाळ झालं. मी पुन्हा आई झाले , ती आई जी आपल्या पिल्लाला  दुःखात बघू शकत नाही, आपल्या पिल्लाच्या वेदना तिला सहन होत नाहीत . आई ही आई च असते, मग ती डुकराच्या पिल्लाची  असो किंवा माणसाच्या पिल्लाची . पिल्लांसाठी  ती आपल्या जीवाचं  रान करते. आई या शब्दाचा अर्थ आई झाल्यावरच कळतो. म्हणूनच माझ्यातल्या आई ला त्या डुकराच्या पिल्लाच्या  आई च्या वेदना सहन होत नव्हत्या .जगातल्या प्रत्येक आई ला माझा सलाम आहे.

Disclaimer: The views, opinions and positions (including content in any form) expressed within this post are those of the author alone. The accuracy, completeness and validity of any statements made within this article are not guaranteed. We accept no liability for any errors, omissions or representations. The responsibility for intellectual property rights of this content rests with the author and any liability with regards to infringement of intellectual property rights remains with him/her.

Previous article «
Next article »