बालपणीच्या आठवणी
माझी मुलगी साडेतीन वर्षांची आहे. ती नेहमी खायला, ब्रश करायला, अंघोळ करायला टाळाटाळ करते.
“पिल्लू चल जेवण करू”
“नको मम्मा थोडा वेळाने”
“चल पिल्लू अंघोळ करू”
“नको मम्मा थोडा वेळाने”
अस करत करत तिचा “थोडा वेळ” काही येतच नाही. मग मला सगळे जबरदस्ती करावे लागे.
नाहीतर मग हे सगळे तिला टीव्ही किंवा मोबाईल दाखवत ह्या सर्व गोष्टी कराव्या लागत.
हळूहळू तील अशीच सवय झाली ती टीव्ही आणि मोबाईल शिवाय काहीच करत नव्हती.
माझ्या डोक्यात सारखे विचार तिचे डोळे खराब होतील. अजूनही बाकी दुष्परिणाम मला दिसत होते. तेव्हा माझ्या आईने मला एक कल्पना सुचवली की तिला तुम्ही लहान असताना जी गम्मत करत होतात, खेळत होतात, ती गोष्ट महणून सांगत जा कारण आताच्या मुलांना व्हिडिओ गेम शिवाय काही माहित नाही. मग मी तिला आम्ही लहान असताना सुरपारंब्या, लंगडी, लगोर ,भुलाबाई,धप्पाकुत्ती असे रोज आम्ही लहान असतानाची गम्मत सांगायचे.
आणि गम्मतच झाली माझी मुलगी मी सांगितलेल्या गोष्टी ऐकत सर्व गोष्टी वेळेवर करू लागली आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तिचे मोबाईल आणि टीव्ही पाहणे एकदम बंदच झाले .
आईने जर मला ही कल्पना सुचवली नसती तर काय! तेव्हा पासून रोज मला मी लहान असताना काय काय गम्मत केली ते आठवत होते.
काही का असेना पण माझ्या मुलीमुळे मी माझ्या बालपणात रमत होते. लहानपणी केलेल्या गोष्टी आठवून हळूच चेहऱ्यावर अलगद हसू येत होते.
एका दिवशी तर गम्मतच झाली बाजूच्या मनुश्री ची मम्मी येऊन मला विचारत होती की “तुमची अन्वी आमच्या मनुश्रीला कोणती लहानपणीची गोष्ट सांगत आहे?. मनुश्री रोज घरी येऊन टीव्ही,मोबाईल न पाहता गोष्ट एकत जेवण करत आहे,तुम्ही काय आयडिया केली मला पण सांगा”. मग मी त्यांना सर्व घडलेलं सागितले. आता रोज रात्री झोपताना माझ्या मुलीला गोष्ट सांगावी लागते.
कधी कधी कंटाळा येतो पण मोबाईल आणि टीव्ही पाहण्यापेक्षा हे बरे असे वाटते. थोडा आपल्या डोक्याला त्रास बाकी काय. लेकरासाठी एवढे तर आपण सगळे जण करू शकतोच ना!
काय मग विचार कसला करताय? आठवा आपले बालपण आणि सांगा आपल्या मुलांना! पहा आपल्या बालपणात काय जादू आहे!
घ्या एकदा तुम्ही पण अनुभव!
Disclaimer: The views, opinions and positions (including content in any form) expressed within this post are those of the author alone. The accuracy, completeness and validity of any statements made within this article are not guaranteed. We accept no liability for any errors, omissions or representations. The responsibility for intellectual property rights of this content rests with the author and any liability with regards to infringement of intellectual property rights remains with him/her.